जाहिरात

नणंद विरुद्ध भावजय संघर्ष रंगणार! 'रोहिणी खडसेंचा प्रचार करणार का? रक्षा खडसेंनी स्पष्ट सांगितलं

रोहिणी खडसे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुलीच्या प्रचाराला सुरुवात केली होती. दुसरीकडे भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री असलेल्या रोहिणी खडसे यांच्या भावजयी रक्षा खडसे यांनी मात्र रोहिणी खडसेंचा प्रचार करणार नाही, असे म्हणत नणंदेविरोधात कंबर कसली आहे.

नणंद विरुद्ध भावजय संघर्ष रंगणार! 'रोहिणी खडसेंचा प्रचार करणार का? रक्षा खडसेंनी स्पष्ट सांगितलं

प्रांजल कुलकर्णी, नाशिक:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जळगावच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रोहिणी खडसे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुलीच्या प्रचाराला सुरुवात केली होती. दुसरीकडे भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री असलेल्या रोहिणी खडसे यांच्या भावजयी रक्षा खडसे यांनी मात्र रोहिणी खडसेंचा प्रचार करणार नाही, असे म्हणत नणंदेविरोधात कंबर कसली आहे, नाशिकमध्ये त्या माध्यमांशी बोलत होत्या. 

काय म्हणाल्या रक्षा खडसे?

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात रोहिणी खडसे यांचा प्रचार करणार नाही, असे म्हणत भाजप नेत्या रक्षा खडसे यांनी नणंदेविरोधात थेट भूमिका घेतली आहे. 'मुक्ताईनगरमध्ये आमचे महायुतीचे उमेदवार आहेत,  आमच्या पक्षाच्या उमेदवारांचे मी काम करेल, पण रोहिणी खडसेंचा प्रचार करणार नाही,' असं त्या म्हणाल्या. तसेच 'नाथा भाऊंनी कोणताही लपून- छपून प्रचार केला नाही, त्यांची भूमिका उघड आहे, नाथाभाऊ आधी भाजपमध्ये होते, नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, लोकसभेला त्यांनी मला पाठिंबा दिला. ते वरिष्ठ नेते, त्यांनी विधानसभेला कोणती भूमिका घ्यायची, तो त्यांचा निर्णय आहे,' असही त्या म्हणाल्या. 

नक्की वाचा: 'आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देतो', शरद पवारांच्या उमेदवाराचे अजब आश्वासन; भाषणाची जिल्ह्यात चर्चा!

मविआवर टीकास्त्र! 

यावेळी बोलताना रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार निशाणा साधला. "महाविकास आघाडीने लोकसभेला फेक नरेटीव्ह सेट केला. पण आम्ही संविधान बदलणार असे कधीही समोर आले नाही. लोकसभेला फटका बसला मात्र सध्या उत्तर महाराष्ट्रात भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे, महिलांचा चांगला प्रतिसाद आहे, लाडकी बहीण योजनेलाही मोठा पाठिंबा मिळत आहे," असा दावाही त्यांनी केला. 

यावेळी बोलताना रक्षा खडसे यांनी जळगावमध्ये भाजपला मोठे यश मिळेल, असाही विश्वास व्यक्त केला आहे. 'जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने काम केले आहे, त्यामुळे विजय निश्चित आहे. लोकसभेला कांद्याचा फटका बसला. मात्र केंद्राने पॉलिसी करायचा निर्णय घेतला होता, अशावेळी आंतरराष्ट्रीय बाजार आणि ग्राहक यांचाही विचार करावा लागतो, असे म्हणत शेतकरी कोणताही असो काम करणार' असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, रक्षा खडसे यांच्या या भूमिकेमुळे मुक्ताईनगरमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ट्रेडिंग बातमी: BJP Action : भाजपने 40 नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी; काय आहे कारण?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com