प्रतिनिधी, राहुल कुलकर्णी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघात बुधवारी (26 जून) मतदार पार पडणार आहे. यामध्ये शिरपूर तालुक्यातील तीन, शिंदखेडा तालुक्यात दोन, साक्री तालुक्यात दोन तर धुळे तालुक्यात पाच अशा एकूण 12 मतदान केंद्रांचा समावेश आहे. दरम्यान नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अवघे चार दिवसांचा अवधी शिल्लक असताना उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत. जळगाव शहरात या निवडणुकीत उमेदवारांकडून पतीला महागड्या कंपनीचे शर्ट आणि पँट, पत्नीला पैठणी आणि सोन्याची नथ घरपोच पोहचवण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 96 शिक्षक मतदार आहेत. शिक्षक मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवारांच्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. शिक्षक मतदारांना वाटप करण्यात आलेली ड्रेस, पैठणी आणि नथीचा फोटो NDTV च्या हाती लागले आहेत. उमेदवार भाऊसाहेब कचरे यांच्याकडूनही याबाबत तक्रार करण्यात आली आहे. भाऊसाहेब कचरे हे टीडीएफचे उमेदवार आहेत.
कोणत्या पक्षाच्या उमेदवाराने शिक्षक मतदारांना ही भेट दिली हे विचारले असता मी भेट स्वीकारली नाही. फोटो मित्राला मिळालेल्या भेटीचा असल्याचे टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांनी सांगितले. मतदारांना घरपोच भेटवस्तू पोहोचवण्यात येत आहेत. शिक्षक पतपेढीच्या संचालकांना रोख 10 हजार रुपये देण्यात येत आहेत.
नक्की वाचा - विधानपरिषदेची निवडणूक जाहीर; 11 जागांसाठी 12 जुलैला होणार मतदान
रविवारी या निवडणुकीत शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी शिक्षकांच्या बैठका व स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. ठाकरे पक्षाच्या उमेदवाराची बैठकीला हजर असलेले शिक्षकांचे नेते यावेळी आयोजित बैठकीलाही उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world