जाहिरात

PMC Election 2026: उपरे बोकांडी बसलेत, 110 टक्के पडणार! भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने पक्षाला शाप दिला

Pune Municipal Corporation Election 2026: 23 डिसेंबरपासून पुणे महापालिका निवडणुकीत भाग घेणाऱ्या उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती. मंगळवारी म्हणजेच 30 डिसेंबर रोजी ही मुदत संपली.

PMC Election 2026: उपरे बोकांडी बसलेत, 110 टक्के पडणार! भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने पक्षाला शाप दिला
पुणे:

महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांची निवडणूक होणार असून पुणे महापालिकेचाही यामध्ये समावेश आहे. 15 डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. पुण्यात एकूण 41 प्रभाग असून यात 165 जागा आहेत. 23 डिसेंबरपासून पुणे महापालिका निवडणुकीत भाग घेणाऱ्या उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती. मंगळवारी म्हणजेच 30 डिसेंबर रोजी ही मुदत संपली. 165 जागांसाठी तब्बल 3,041 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

नक्की वाचा: गुंड आंदेकरच्या कुटुंबियांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी, 'या' वॉर्डातून नशिब आजमावणार, पण एक ट्वीस्ट

पुण्यात भाजप स्वबळावर

पुणे महानगरपालिकेसाठी शिंदेंच्या शिवसेनेसेसोबत युती व्हावी यासाठी भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांना प्रयत्न केले, मात्र युती होऊ शकली नाही. भाजपने पुण्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोबत घेतले असून भाजप पुण्यामध्ये 158 जागांवर लढते आहे तर रिपाईं 7 जागांवर लढते आहे. 

आम्ही उपऱ्यांची घाण साफ करायची का ?

भाजप हडपसर विधानसभेचा झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष युवराज कुचेकर यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुचेकर इच्छुक असलेल्या प्रभागात काँग्रेसमधून आलेल्या नेत्याला भाजपने उमेदवारी दिली असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे भडकलेल्या कुचेकर यांनी म्हटले की,"22 वर्षांपासून मी एकनिष्ठपणे काम करणारा कार्यकर्ता आहे.  माझ्यावर अन्याय झालाय. काँग्रेसचे आयात उमेदवार बोकांडी बसवलेत. पक्षात काम करणाऱ्यांना पक्षाने फळ दिलं नाही. खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार योगेश टिळेकर यांना याबद्दल विचारलं तर ते  एकमेकांकडे बोट दाखवतात. उपऱ्यांची घाण साफ करायचं काम दिलंय आम्हाला.  पक्ष आम्ही वाढवलाय, काँग्रेसने वाढवलेला नाही. आमच्यासोबत हे चुकीचं झालंय, मी पेटवून घेणार नाही; ते आपोआप पेटणार आहे. 110 टक्के तो उमेदवार पडणार आहे."   

नक्की वाचा: 5 हजाराची चिल्लर, 5 पिशव्या अन् 5 वर्षांची मेहनत! अर्ज भरायला आलेल्या 'या' उमेदवाराची चर्चा का?

पुण्यात शिवसेना आणि भाजपची युती का झाली नाही ?

पुण्यामध्ये युती व्हावी यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे प्रमुख नेते आग्रही होते.  शिवसेनेने सुरुवातीला 35-40 जागांची मागणी केली होती. भाजपने सुरुवातीपासून याला विरोध केला होता. भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. शिंदेंच्या शिवसेनेने ते मान्य करून यादीही तयार केली होती. शिंदेंच्या शिवसेनेने 15 नावांची यादी तयार करून भाजपला दिली. या यादीतील काही नावे भाजपला खटकली होती, प्रभाग क्रमांक '24 ड' मधून भाजपच्या गणेश बिडकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच प्रभागातून रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर याचे नाव शिवसेनेच्या यादीत होते. यावरूनच शिवसेना आणि भाजपमध्ये खटके उडाले आणि युती तुटली असे सांगण्यात येत आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com