जाहिरात

Jalgaon Politics : जळगावमध्ये भाजप नेत्याच्या उपोषणाला ठाकरे गटाच्या नेत्याचा पाठिंबा, राजकीय चर्चांना उधाण

Jalgaon Political News : सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ आल्याने उन्मेष पाटील यांनी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. जळगावमधील उपोषणाच्या या अनोख्या युतीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Jalgaon Politics : जळगावमध्ये भाजप नेत्याच्या उपोषणाला ठाकरे गटाच्या नेत्याचा पाठिंबा,  राजकीय चर्चांना उधाण

मंगेश जोशी, जळगाव

राज्यात भाजप व शिवसेना ठाकरे गटात टोकाचं राजकीय वैर आहे. राज्यात एकमेकांसमोर उभे असलेले दोन्ही पक्ष एका जळगावातील एका आंदोलनात एकत्र दिसत आहे. जळगावमध्ये भाजपच्या उपोषणाला महाविकास आघाडी व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगरचे शिंदे गट समर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उपोषण सुरू केले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. 

(नक्की वाचा - काँग्रेसचे 4 आमदार फुटणार? काँग्रेसच्या नेत्यानेच नाव न घेता दिली माहिती)

सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ आल्याने उन्मेष पाटील यांनी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. जळगावमधील उपोषणाच्या या अनोख्या युतीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

( नक्की वाचा :  विधानपरिषद निवडणूक : आमदार फोडण्यासाठी कोट्यवधींची ऑफर, जयंत पाटील यांनी रेट सांगितला )

कशासाठी सुरुये उपोषण? 

भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांच्या नावे भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारात शेत जमीन आहे. कृषक जमीन अकृषक करण्यासाठी अर्थात लेआउट करण्यासाठी माधुरी अत्तरदे यांनी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र याबाबत मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे समर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यानंतर माधुरी अत्तरदे यांच्या जमिनीच्या लेआउटला स्थगिती आल्याने या विरोधात त्यांचं उपोषण सुरू सुरु आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com