जाहिरात
This Article is From Apr 20, 2024

मुंबईतील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारली जाणार

मुंबईतील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारली जाणार
मुंबईतील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारली जाणार
मुंबई:

महाराष्ट्रात उकाडा वाढला आहे. त्यात मुंबईतील ऊन्हाचे चटके न सोसण्यासारखे आहेत. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. अजून 6 टप्प्यांचे मतदान बाकी आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमावर निवडणूक आयोगाने चांगले पाऊल उचलले आहे. ते म्हणजे प्रथमच मुंबईतील उंच टॉवरमध्ये राहणाऱ्या मतदारांना आता घरबसल्या मतदानाचा आनंद घेता येणार आहे. मुंबईतील उंच टॉवरमध्ये राहणाऱ्या मतदारांसाठी मतदान केंद्र उबारली जाणार आहे. मतदारांना लांब रांगेत उभं राहावं लागतं, ऊन्हाचे चटके सोसावे लागतात, त्यातही 85 पेक्षा अधिक वय असलेल्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे. 

मतदानवाढीसाठी निवडणूक आयोग विविध पद्धतीच्या योजना राबवित आहे. मुंबईतील उंच टॉवरमध्ये राहणाऱ्या मतदारांनी फक्त घरातून बाहेर यायचं आणि मतदान करुन जायचं. ही व्यवस्था निवडणुक आयोगाकडून करण्यात आली आहे. शहरातील निवडक 63 हाउसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्याचे निश्चित केले आहे.  

रहिवाशांशी संवाद साधून आणि सर्व निकष बघूनच मतदान केंद्र ठरवली जात आहेत. मतदान केंद्राबाहेर मतदारांनी रांगेत उभे राहू नये यासाठी मतदारांना टोकन नंबर दिले जाईल, बसण्याची सोय देखील केली जाणार आहे. त्यांचा नंबर आला की त्यांनी मतदान करायला जायचं.

उपनगरातील 17 ठिकाणांचा समावेश !

उपनगरांत 4 विधानसभा मतदारसंघातील उच इमारतींमध्ये मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिम, वांद्रे, विलेपार्ले, मानखुर्द, शिवाजीनगर या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी मतदान केंद उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

कोणत्या इमारतींमध्ये मतदान केंद्र ? जाणून घ्या 

  • धारावी वैभव की-ऑपरेटिव्ह सोसायटी, अभ्युदय बँकेसमोर, धारावी क्रॉस रोड सायन कोळीवाडा: अल्टिया लोवा न्यू कफ परेड, अॅनटॉप हिल
  • वडाळा सेंद्रम टॉवर, तळमजला, वाहनतळ
  • माहीम: मकरद को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शेफाली बिल्डिंग, तळमजला.
  • वरळी: लोखंडवाला रेसिडेन्सी, वाहनतळ, गांधी नगर मलबार हिल: अर्थ प्राइड सोसायटी, वाहनतळ, खाडीलकर रोड.
  • मुंबादेवी: नवजीवन सोसायटी कंपाउंड, मुंबई सेंट्रल
  • कुलाबा: नथुराम पोहार बाग, तळ मजला, बाबासाहेब जयकर मार्ग

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com