जाहिरात

'राजकारणात आल्यापासून कोणताही पक्ष बदलला नाही, जनता हाच...'; अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ अजितदादा मैदानात! 

'राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदलला नाही. जनता हाच माझा पक्ष. राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल हाच विचार माझ्या डोक्यात सुरू असतो. '

'राजकारणात आल्यापासून कोणताही पक्ष बदलला नाही, जनता हाच...'; अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ अजितदादा मैदानात! 
मुंबई:

राज्यसरकारने काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. याशिवाय वारकरी, शेतकरी यांच्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज अजित पवारांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन केलं आहे. 

यावेळी अजित पवारांनी विरोधकांविरोधात संताप व्यक्त केला. अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी वर्गासाठी योजना जाहीर केल्या. मदत जाहीर केली, पण विरोधक शेतकरी वर्गाला काहीच दिलं नसल्यातं म्हणत बोंबाबोंब करतात. विकासचा वादा म्हणजे अजित दादा, आम्ही राज्याला विकासचं मॉडेल दिलं. जो जास्त काम करतो, त्यावर जास्त टीका होतेच.माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, परंतू अद्याप माझ्यावरील एकहा भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झालेला नाही. फक्त बदनामी केली जाते, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.  

राज्यातील प्रत्येक महिला सक्षम व्हावी. स्वत:च्या पायावर उभी राहावी. आपण कोणावर अवलंबून आहोत असं वाटू नये, यासाठी लाडक बहीण योजना राबवण्यात आल्याचं पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, राज्यातील माता भगिनींनी स्वत:च्या पायावर उभं राहावं यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिला उद्योजकांना साहाय्य केलं जात आहे. शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या महिलांना मोफत शिक्षण दिलं जात आहे. मात्र विरोधकांकडून  बजेटला नावं ठेवली जात आहे. तुमचा दादा काम करणारा आहे.

नक्की वाचा - 'लाडकी बहीण' योजनेच्या अटीमध्ये महत्त्वाचे बदल, अर्ज भरण्यापूर्वी वाचा सर्व माहिती

राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदलला नाही. जनता हाच माझा पक्ष. राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल हाच विचार माझ्या डोक्यात सुरू असतो. म्हणून शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या. 44 लाख शेतकऱ्यांचं वीजबिल माफ केलं. हे विरोधकांना सहन होत नाही. अर्थसंकल्प ग्रामीण भागावर विशेष लक्ष देणारा आहे. राज्याच्या विकासासाठी यांचं काही देणंघेणं नाही. गावगाडा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी दिला. अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी वर्गासाठी योजना जाहीर केल्या मदत जाहीर केली पण विरोधक शेतकरी वर्गाला काहीच नाही असं म्हणत बोंबाबोंब करतात. अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधक झोपले होते का, असं म्हणज अजित पवारांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com