
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाता. त्यांचे रोखठोक बोलणे लोकांना पटते. ते शुक्रवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी असेच एक बिंधास्त वक्तव्य केले. त्यात त्यांना गँगचा उल्लेख केला. मला एका गँगने नकोसे केले आहे, असे ते थेट म्हणाले. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. शिवाय त्याची राजकीय वर्तूळातही चर्चा सुरू झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सत्तेत आल्यानंतर बारामतीत विकास कामांचा धडाका लावला असल्याचं अजित पवार म्हणाले. मात्र त्यावेळी त्यांनी संताप ही व्यक्त केला. मला या मलिदा गँगने तर नकोसे केलं आहे असं वक्तव्य क्यांनी केले. त्यांचा बोलण्याचा रोख हा स्थानिक पुढाऱ्यांवर होता. ते थेट म्हणाले एकतर पुढारपण करा नाहीतर ठेकेदार व्हा. असं म्हणत दादांनी भर सभेत ठेकेदारांना आणि पुढाऱ्यांना झापले. त्यामुळे एक वेगळीच चर्चा सध्या मतदार संघात ऐकायला मिळत आहेत. पुढारी हेच ठेकादार आहेत की काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
मी तुमची विकासाची कामे करण्यासाठी निवडून येतो. विकासात कुठे कमी पडलो तर जाब विचारा असं ही अजित पवार म्हणाले. 100 दिवस सरकारला झाले आहेत. शंभर दिवसात बारामतीला 1000 कोटी रुपये विकासासाठी आणले आहेत.मी बाकीच्यांसारखं कुठं भेटायला गेलो की फोटो काढत नाही. नमस्कार करायचा आणि फोटो काढायचा. फोटो काढून प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रशासनावर दरारा असायला लागतो. असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना डिवचले, अशी ही चर्चा यानंतर झाली.
बारामतीच्या माळेगाव मध्ये शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या शेतकरी मेळाव्यात अजित पवार प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. काहीजण म्हणाले अजित पवारांच्या ताब्यात इतर कारखाने आहेत, म्हणून अजित पवारांनी माळेगाव कारखान्याला 2800 रुपयांचं पेमेंट काढायला भाग पाडले. पण कर्जाचा बोजा डोक्यावर न चढता चांगला भाव कसा मिळेल असा आमचा प्रयत्न असतो. माझ्यात जीवात जीव असेपर्यंत माळेगावला धक्का लागू देणार नाही, ज्या दिवशी मला होणार नाही त्या दिवशी जाहीर सभा घेऊन सांगेन, ते आजपासून मला होणार नाही. असं म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता युगेंद्र पवारांना लक्ष केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world