जाहिरात

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, मुख्यमंत्री शिंदेंनी केली खास उपाययोजना

बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, मुख्यमंत्री शिंदेंनी केली खास उपाययोजना
मुंबई:

बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पावले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला आहे.  बांगलादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित कृतीची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यांची तात्काळ सुरक्षितता सुनिश्चित करणे, आवश्यकता असल्यास बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे, भारतात त्यांच्या सुरक्षित परतीची प्रक्रिया जलद करणे याअनुषंगाने त्यांनी चर्चा केली आहे.

ट्रेंडिंग बातमी -  पाकिस्तान, नेपाल, श्रीलंका, मालदीव आणि आता बांगलादेश... धूर्त चीन कसं रचतोय चक्रव्यूह?

बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती एकत्रीत केली  गेली आहे. ही यादी परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात  आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित संपर्क साधण्यास आणि मदत उपलब्ध करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे. बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येतील. 

( नक्की वाचा : दिल्लीतील कोठी नंबर 56 ची गोष्ट, जिथं मिसेस मजूमदार नावानं होतं शेख हसीनाचं वास्तव्य )

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांचे मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसमवेत सक्षमपणे उभे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
..... तर 288 जागा लढवू, किशोरी पेडणेकर यांचा काँग्रेसला इशारा
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, मुख्यमंत्री शिंदेंनी केली खास उपाययोजना
Manoj Jarange Patil will visit Rajkot Fort in Sindhudurga on 1 September
Next Article
मनोज जरांगे 'राजकोट'ला जाणार, वातावरण आणखी तापणार?