
धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत विरोधक नेहमीच टीकेची झोड उठवत असतात. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे. सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. त्यांनी काही झालं तरी धारावी पुनर्विकास प्रकल्प आम्ही करू दाखवणार असं सांगितलं आहे. शिवाय धारावीतील लोकांना धारावीतच घर देणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या मुलाखतीत बोलताना त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाची संकल्पना ही राजीव गांधीच्या काळात मांडली गेली होती. पण पुढे काहीच झाले नाही. ज्या वेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी धारावी पुनर्विकासाचा डीपीआर तयार केला असं फडणवीस म्हणाले. या प्रकल्पासाठी काही अतिरीक्त जागाही लागणार होती. त्यासाठी रेल्वेकडून जागाही विकत घेण्यात आली. त्यानंतर टेंडर काढण्यात आलं. पण त्यानंतर आमचं सरकार गेलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं.
ट्रेंडिंग बातमी - खातेवाटपावरून महायुतीत ओढाताण? गृहच्या बदल्यात 'हे' खातं देण्याची भाजपची तयारी
महाविकास आघाडीच्या सरकारने हे टेंडर रद्द केलं असं फडणवीसांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यानंतर त्यात नव्या अटी आणि शर्ती उद्धव ठाकरेंच्या सरकारने टाकल्या. ठाकरेंचे सरकार गेल्यानंतर आम्ही त्यांनी ठेवलेल्या अटी आणि शर्ती तशाच ठेवल्या. त्यात केवळ एकच बदल केला. जो विकासकाला टीडीआर मिळणार होता त्याला आम्ही कॅपिंग केले. ते कॅपिंग ठाकरे सरकारने केले नव्हते. जर कॅपिंग केले नसते तर विकासकाने मोनोपोली केली असती असं फडणवीस यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांचे उमेदवार पराभूत कसे झाले? देवगिरीवर त्यांनी पाढाच वाचला
त्यानंतर नव्याने टेंडर काढण्यात आलं. त्यात अदाणी हे यशस्वी झाले. त्यामुळे त्यांना हे काम देण्यात आलं आहे. त्यात गैर काही नाही असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. शिवाय धारावीत 2011 पर्यंतच्या पात्र रहिवाशांना धारावीतच घर देणार असल्याचे फडणवीसांनी सांगितलं आहे. जे पात्र नाहीत त्यांनाही आम्ही असेच सोडणार नाही. त्यांना जर असेच सोडले तर ते दुसरी धारावी तयार करतील. म्हणून त्यांच्यासाठी रेंटल हाऊसिंगची योजना आणली आहे. ते या ठिकाणी दहावर्ष राहील्यानंतर काही रक्कम भरून ते घर आपल्या नावावर करू शकता. अशी ही योजना असल्याचंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंचं मन फडणवीसांनी कस वळवलं? पडद्यामागे काय घडलं? NDTV मराठी Exclusive
बीडीडी चाळींचा विकासही रखडला होता. कोणत्याही सरकारने त्यासाठी काम केलं नाही. शेवटी आमच्या सरकारने ते करून दाखवले. म्हाडाच्या माध्यमातून आम्ही बीडीडी चाळींच्या पुनर्विकास करून दाखवला. असं सांगताना आम्ही आता धारावीचा काही झालं तरी पुनर्विकास करून दाखवणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. विरोधक जे आरोप करत आहेत ते सर्व आरोप या निमित्ताने फडणवीस यांनी खोडून काढले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world