जाहिरात
This Article is From Feb 16, 2025

Shivsena News: साळवींनी पक्ष सोडला, जाधव नाराज, वैभव नाईक काय करणार?

भास्कर जाधव बोललेत की, जे नाराज आहेत त्यांना आपण थांबविले पाहिजे. भास्कर जाधव स्वतःहून नाराज नाहीत.

Shivsena News: साळवींनी पक्ष सोडला, जाधव नाराज, वैभव नाईक काय करणार?
सिंधुदुर्ग:

शिवसेना ठाकरे गटाला सध्या गळती लागली आहे. अनेक नेते पक्ष सोडत आहे. कोकणात तर ठाकरेंची साथ सोडण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यांच्या पाठोपाठ रत्नागिरीतील माजी आमदार सुभाष बने यांनीही ठाकरेंची साथ सोडली. त्यांच्या बरोबर अनेक कार्यकर्तेही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्याच वेळी भास्कर जाधव हे नाराज असल्याची बातमी समोर आली. या सर्व घडामोडी होत असताना आता सिंधुदुर्गातील ठाकरे गटाते नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी मोठे व्यक्तव्य केलं आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वैभव नाईक हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. शिवाय ते माजी आमदार ही आहेत. शरद पवारांबाबत 2019 सालीच विचार करायला हवा होता. आता बोलून काय उपयोग असे वक्तव्य केले होते. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. नाईक हे राणेंचे कट्टर विरोधक मानले जातात. आता कोकणातील एक एक नेता ठाकरेंची साथ सोडत आहे. त्यावेळी नाईक यांनी मोठे विधान केले आहे. कोकणातील काहीच नेते पराभूत झाल्यानंतर त्यांना लढायची इच्छाच नव्हती. ते शिवसेना सोडून गेले, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - HoneyTrap: हनी ट्रॅप म्हणजे काय? तो कोणासाठी असतो? या ट्रॅपमध्ये 'ते' कसे अडकतात?

यापूर्वी 2009 मध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता. त्यावेळी कोकणातील जनता शिवसेनेबरोबरच राहिली होती. त्यामुळे मी असू दे किंवा माझ्या बरोबरील सहकारी असु दे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहोत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणार आहोत. असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केले आहे. वैभव नाईक यांच्या या वक्तव्याने ठाकरे गटाला काही अंशी दिलासा मिळाला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...

शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे. आज जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोण होते? सामंत, केसरकर, राणे यांचे उदाहरण त्यांनी दिले. यांना शिवसेनेनं मोठं केलं. त्यानंतर ते दुसऱ्या पक्षात जावून नेते बनले आहेत असंही नाईक म्हणाले. शिवसेना सामान्य कुटुंबातील लोकांना नेते बनवित आहे. येणाऱ्या काळात नवीन लोकांना घेऊन हा पक्ष उभारू करू. नवीन उमेदीने काम करू असा विश्वास या निमित्ताने वैभव नाईक यांनी व्यक्त केला. 

ट्रेंडिंग बातमी - Beed News: आता बबन गित्तेच्या भोवती फास आवळला, संपत्तीवर येणार टाच, प्रकरण काय?

भास्कर जाधव बोललेत की, जे नाराज आहेत त्यांना आपण थांबविले पाहिजे. भास्कर जाधव स्वतःहून नाराज नाहीत. भास्कर जाधव यांच्या ज्या काही अडचणी असतील, त्या उद्धव ठाकरेंशी बोलतील सुटतील. शिवाय पुन्हा आम्ही सर्व एकत्र काम करू असं ही नाईक म्हणाले. नाईक हे नारायण राणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. नारायण राणेंचा विधानसभेत वैभव नाईक यांनीच पराभव केला होता. सध्या ठाकरे गटाला गळती लागली आहे. अशा स्थिती वैभव नाईक यांनी काही झाले तरी ठाकरेंबरोबर राहण्याचा निश्चय केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com