काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचारामध्ये व्यस्त आहेत. व्यस्त प्रचारातून विश्रांती घेत त्यांनी शुक्रवारी रात्री तामिळनाडूमधील सिंगनाल्लूर येथील एका मिठाईच्या दुकानाला भेट दिली. तिथे त्यांनी इतर मिठाईंसह गुलाबजामचाही आस्वाद घेतला. डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन यांना भेट देण्यासाठी राहुल गांधी यांनी या दुकानातून प्रसिद्ध मिठाई 'म्हैसूर पाक' देखील विकत घेतली.
Shri @RahulGandhi gifts famous Mysore Pak to Shri @mkstalin.
— Congress (@INCIndia) April 12, 2024
Celebrating the loving relationship he shares with the people of Tamil Nadu. pic.twitter.com/Lw8vYrCC8L
राहुल गांधी मिठाईच्या दुकानात पोहोचताच दुकान मालक बाबू आश्चर्यचकित झाला. बाबूने एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना सांगितलं की, राहुल गांधी आल्याने आम्हाला आश्चर्य वाटलं. ते बहुधा कोईम्बतूरला मीटिंगसाठी येत होते. त्यांना गुलाबजाम आवडतात. त्यांनी एक किलो मिठाई विकत घेतली. इतर मिठाई देखील चाखली. ते आमच्य दुकानात आल्याचा मला आनंद झाला, त्यांना पाहून आमचा स्टाफही खूश झाला. ते इथं 25 ते 30 मिनिटं थांबले होते. ते येणार असल्याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आम्ही त्यांना पैसे देऊ नका असे सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी बिलाचे पूर्ण पैसे भरले.
हेही वाचा : मनोज जरांगेंकडून राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवणारी घोषणा, आरक्षणाचा मुद्दा पुन्हा गाजणार
राहुल गांधी यांनी शुक्रवारी तामिळनाडूतून पहिल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत, काँग्रेस-डीएमके-नेतृत्वाखालील आघाडीने राज्यातील 39 पैकी 38 जागा जिंकल्या, तर AIADMK ने फक्त एक जागा जिंकली होती. शुक्रवारी कोईम्बतूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर तामिळ भाषा, इतिहास आणि तिथल्या परंपरांचा "अपमान" केल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या भाषा, इतिहास आणि परंपरांवर का आक्रमण करतात? असा सवाल वायनाडच्या खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world