विधासभेचे कामकाज सुरू होण्या आधी सत्ताधारी आणि विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर भिडल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आधी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर पोस्टरबाजी करत विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. एक अकेला मोदी सब पे भारी अशा आशयाचे बॅनर शिंदे गटाच्या आमदारांनी फडकवले. तर त्याला तेवढेच जोरदार प्रत्युत्तर विरोधकांनी दिले. गाजर हलवा सरकार पळवा अशी घोषणाबाजी कर विरोधकांनी विधानसभवनाचा परिसर दणाणून सोडला. त्यामुळे सभागृहातल्या संघर्षा आधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हा संघर्ष पाहायला मिळाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिंदे गटाने विरोधकांना डिवचले
विरोधक सध्या सत्ताधाऱ्यां विरोधात भलतेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडणार नाहीत हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चांगलेच डिवचले आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी बॅनर झळकवले होते. या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो होता. त्यावर एक अकेला मोदी सब पे भारी असा उल्लेख होता. शिवाय त्या खाली गिरे तो भी टांग उपर असे लिहीत तिथे राहुल गांधीचा फोटो लावण्यात आला आहे. शिवाय हरल्या मुळे पेढे घ्या हो पेढे घ्या असा उल्लेख करत विरोधकांची खिल्लीही उडवण्यात आली आहे.
विरोधकांचे जशाच तसे उत्तर
विरोधकांनीही तेवढ्याच आक्रमकतेने याला प्रत्युत्तर दिले. गाजर हलवा सरकार पळवा अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी केली. आज अर्थ संकल्प सादर कोणार आहे. त्यात आश्वासनाचे गाजर दाखवले जाईल असा आरोप विरोधकांनी केला. शिवाय शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली पाहीजे अशी घोषणाबाजीही करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीने पायऱ्यांवर आंदोलन केले. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची पीछेहाट झाली यावर विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले.शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी असे बॅनरही यावेळी झळकले. शिवाय विरोधकांच्या हातातही गाजरे होते. सत्ताधारी आमदारांना ते दाखवली जात होती.
ट्रेंडिंग बातमी - अर्थसंकल्पात बड्या घोषणांची शक्यता? कोणाच्या पदरात काय पडणार?
विधानसभेत ही विरोधक सत्ताधाऱ्यांना भिडणार
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्याकडे सरकार सोयिस्कर पणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. पिक विमा योजना असेल किंवा हर घर जल योजना असेल या योजनांचा कसा बट्ट्याबोळ झाला आहे यावर ही विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारतील. कांद्या वरील निर्यात बंदी, शेती मालाला भाव नसणे हे मुद्देही विरोधकांनी घेतले आहेत. त्यामुळे अर्थ संकल्पा आधी सरकारची कोंडी करण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळे आजचा दिवस गाजणार हे निश्चित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world