जाहिरात
Story ProgressBack

IPL 2024: विराट - रोहित असो वा बुमराह-राशिद आयपीएलमधील हे रेकॉर्ड मोडणे आहे सर्वांनाच अवघड

IPL 2024 : आयपीएलमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू खेळतात. या सर्वांनाही काही रेकॉर्ड मोडणे जवळपास अशक्य आहे.

Read Time: 2 min
IPL 2024: विराट - रोहित असो वा बुमराह-राशिद आयपीएलमधील हे रेकॉर्ड मोडणे आहे सर्वांनाच अवघड
मुंबई:

जगातील सर्वात प्रतिष्ठेची टी20 लीग ही ओळख असलेल्या आयपीएलला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात या सिझनमधील पहिली मॅच होणार आहे.

आयपीएलचा हा सतरावा सिझन असून यामध्ये काही रेकॉर्ड मोडणे हे सर्वात अवघड आहे.

सर्वाधिक वैयक्तिक रन

वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा 11 वर्षांचा रेकॉर्ड यंदाही कुणीही मोडण्याची शक्यता नाही. गेलनं आरसीबीकडून खेळताना 2013 साली 66 बॉलमध्ये 175 रन्स केले होते. गेलच्या या खेळीत 13 फोर आणि 17 सिक्सचा समावेश होता. 

एका सिझनमध्ये सर्वाधिक रन्स

आरसीबीचा प्रमुख खेळाडू विराट कोहली 2016 च्या सिझनमध्ये जबरदस्त फॉर्मात होता. विराटनं त्या सिझनमध्ये चार सेंच्युरीसह 973 रन्स केले आहेत. विराट कोहलीचा हा रेकॉर्ड देखील अद्याप अबाधित आहे. आयपीएलमधील वाढती स्पर्धा लक्षात घेता तो यापुढेही कायम राहण्याची चिन्ह आहेत.

एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स

ख्रिस गेल आणि रविंद्र जडेजा यांच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. या दोघांनीही एकाच ओव्हरमध्ये 37 रन्स करण्याचा पराक्रम केलाय. त्यांना नो आणि वाई़ड बॉलचीही मदत मिळाली. पण, त्यानंतरही ओव्हरच्या प्रत्येक बॉलवर या प्रकारची फटकेबाजी करणे अवघड आहे.

सर्वाधिक फायनल

आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. धोनीनं आत्तापर्यंत  9 आयपीएल फायनलमध्ये खेळण्याचा विक्रम केलाय. यापैकी आठवेळा तो चेन्नई सुपर किंग्सकडून तर एक वेळा रायझिंग सुपर जायंट्सकडून आयपीएल खेळलाय. धोनीचा हा विक्रमही भविष्यात कुणी मोडण्याची शक्यता कमी आहे.

तीन हॅट्ट्रिक

भारताचा दिग्गज स्पिनर अमित मिश्रानं आयपीएल स्पर्धेत आत्तापर्यंत तीन वेळा हॅट्ट्रिक घेण्याची कमाल केलीय. मिश्राजी म्हणून क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या या दिल्लीकर स्पिनरनं 2008, 2011 आणि 2013 च्या सिझनमध्ये ही कामगिरी केलीय.अमित मिश्रानंतर युवराज सिंहचा या यादीत नंबर आहे. युवराजनं आयपीएलमध्ये दोन वेळा हॅट्ट्रिक घेतलीय. पण युवराज क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्त झाल्यानं अमित मिश्राचा हा रेकॉर्ड यंदाही कायम राहील हे स्पष्ट आहे. 

सर्वाधिक सलग विजय

गौतम गंभीर या सिझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेटाँर बनलाय.गंभीरच्या कॅप्टनसीमध्ये केकेआरनं दोन वेळा आयपीएल विजेतेपद मिळवलंय. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सनं या शर्यतीमध्ये केकेआरला बरंच मागं टाकलंय. पण, गंभीरच्या काळातील त्यांचा एक रेकॉर्ड मोडणं अद्याप कुणालाही जमलेलं नाही. गंभीरच्या कॅप्टनसीमध्ये केकेआरनं सलग 10 आयपीएल सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम यापुढेही अबाधित राहण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination