जाहिरात

टीम इंडियाला मिळालेल्या 125 कोटींचं कसं होणार वाटप? प्रत्येकजण होणार मालामाल

How Rs 125 crore T20 World Cup prize money will be split : टीम इंडियाला बीसीसीआयकडून मिळालेल्या 125 कोटींचं वाटप कसं होणार आहे? ही चर्चा सध्या फॅन्समध्ये सुरु आहे.

टीम इंडियाला मिळालेल्या 125 कोटींचं कसं होणार वाटप? प्रत्येकजण होणार मालामाल
मुंबई:

How Rs 125 crore T20 World Cup prize money will be split: टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. हे विजेतेपद पटकावून भारतीय टीम मायदेशी परतली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीमचं स्वागत करण्यासाठी मुंबईमध्ये लाखो क्रिकेट फॅन्स एकत्र आले होते. रोहित शर्माच्या टीमची मरिन ड्राईव्हवरुन निघालेली विजयी मिरवणूक संपूर्ण जगभर चर्चेचा विषय बनली. या मिरवणुकीतील अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  वर्ल्ड कप विजेतेपद पटकावल्यानंतर बीसीसीआयनं (BCCI) टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात बक्षिसाचा चेक बीसीसीआयनं टीमला सोपवला. त्यानंतर या रकमेचं खेळाडूंमध्ये कसं वाटप होईल? कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळेल? याची चर्चा क्रिकेट फॅन्समध्ये सुरु झाली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसं होणार 125 कोटींचं वाटप?

याबाबतच्या रिपोर्टनुसार, बेंचवरील खेळाडूंसह सर्व खेळाडूंना 5-5 कोटी रुपये मिळतील. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही इतकीच रक्कम मिळेल. तर अन्य कोचिंग स्टाफला (बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग) 2-2 कोटी रुपये मिळतील. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि अन्य सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी बक्षीस मिळेल. कंडिशनिंग कोच, फिजियो आणि अन्य सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2 कोटी रुपये मिळतील. टीमसोबत प्रवास करणारे रिझर्व्ह खेळाडू - रिंकु सिंह, शुभमन गिल, आवेश खान आणि खलिल अहमदला प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षीस मिळेल. 

( नक्की वाचा : PM मोदींच्या रोहित-द्रविडसह वर्ल्ड कप फोटोची का होतीय चर्चा? )


प्रत्येक खेळाडूला किती रक्कम?

याबाबत प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार 15 सदस्यीय टीममधील प्रत्येक खेळाडूला 5 कोटी रुपये बक्षीसाची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. तर सपोर्ट स्टाफ आणि चार राखीव खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी मिळण्याचा अंदाज आहे. टीम इंडियाच्या यशात मैदानातील खेळाडूंसह मैदानाबाहेरच्या सपोर्ट स्टाफचीही मोठी भूमिका होती. त्यामुळे या विजेतेपदानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दोघांवरही पैशांचा वर्षाव होतय. ही तर सध्या सुरुवात आहे. आता खेळाडूंना संबंधित राज्य सरकार देखाल आगामी काळात भेटवस्तू आणि बक्षीस म्हणून रोख रक्कम देऊ शकतात. 

( नक्की वाचा :  कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? )

महाराष्ट्र सराकारनं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे या चार महाराष्ट्रीय खेळाडूंसह बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांचा विधिमंडळात खास सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय टीमसाठी 11 कोटी रुपयांचं रोख बक्षीस पुरस्कार म्हणून जाहीर केलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com