Babar Azam Controversy: T20 वर्ल्ड कप 2024 ला सुरुवात झालीय. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत यंदा हा वर्ल्ड कप होतोय. या स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट टीमवर सर्वांचं लक्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे वर्ल्ड कपनंतर लगेच बाबर आझमची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. शाहीन आफ्रिदीची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण, हा बदल फार काळ टिकला नाही. या स्पर्धेपूर्वी बाबर आझम पुन्हा एकदा टीमचा कॅप्टन झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
T20 वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान टीमवर जोरदार टीका होतीय. या टीममधील विकेट किपर - बॅटर आझम खानवर सर्वात जास्त टीका झाली आहे. फिटनेसच्या मुद्यावर मी आझम खानला टीमच्या जवळही फिरकू देणार नाही, असं पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं (Shahid Afridi on Pakistan Team Squad) म्हंटलं होतं.
पाकिस्तान क्रिकेट टीम निवडीचा वाद ताजा आहे. त्यातच टीमच्या प्रॅक्टीसचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम त्याचा सहकारी आझम खानला (Babar Azam Called Genda to Azam Khan) गेंडा म्हणतोय. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही जण बाबरनं आझम खानला गेंडा म्हंटलं, असा दावा करतोय. तर दुसरा गट बाबर त्याला दुसरं काही तरी म्हणाला असं सांगतोय.
This is disgusting, below the belt and outright shambolic. Babar Azam saying that "ay gainda nai siddha hoya" to Azam Khan in practice is an exhibit of everything which is wrong with our society and our team both. As captain you can't be using such words.https://t.co/h5G0sJHJ37
— Abdullah (@abdullahhammad4) June 3, 2024
बाबर आझमचं हे वक्तव्य बॉडी शेमिंगचा प्रकार असल्याचं मत काही युझर्सनी व्यक्क केलंय. 'कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट' अशी टीका एका युझरनं केलीय. तर बाबर नेहमी चुकीच्या कारणामुळेच चर्चेत असतो, असं एकानं म्हंटलंय.
( नक्की वाचा : Video : पाकिस्तानी क्रिकेटमध्ये भूकंप, 2 सिनिअर खेळाडूंमध्ये जोरदार भांडण? )
आझम खान पाकिस्तानचा माजी विकेट किपर मोईन खानचा मुलगा आहे. तो त्याच्या जास्त वजनाबरोबरच इंग्लंड सीरिजमधील खराब कामगिरीमुळे देखील ट्रोल होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world