यंदा विकेंडला रेल्वे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.कालपासून पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येतोय.पश्चिम रेल्वे मार्गावरील 162 लोकल फेऱ्या आतापर्यंत रद्द करण्यात आल्यात.तर आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणारेय.आजही अनेक लोकल गाड्या रद्द होतील.तर अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय.