शरद पवार गटाचे नेते माधव जाधव मारहाण प्रकरणामध्ये अखेर गुन्हा दाखल झालेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाली होती. बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्रावर राजेसाहेब देशमुख यांच्या सोबत जाधव गेले असता हा सगळा प्रकार घडलेला होता. संजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड त्यांचा मुलगा निखिल फड यानंही मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कैलास फड त्याचा मुलगा निखिल फड यासह पाच ते सहा जणांवर हा गुन्हा दाखल झालाय. अखेर तीन महिन्यानंतर पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केलेला आहे.