एकाच पक्षात असलेल्या सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीचे खासदार अजित पवार गटाकडनं भाषण करत होते तर भाजपकडून डॉक्टर भागवत कराड हे भाषण करत होते. खासदार प्रफुल्ल पटेल भाषण करत असताना राज्यसभेत पीठासीन सभापती म्हणून सुनेत्रा पवार आणि राज्यसभा सदस्य म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.