इन्स्टाग्राम वरून झालेल्या ओळखीतून मुलीनं आंतरजातीय प्रेम विवाह केला पण या विवाहाला विरोध करत मुलीच्या वडिलांनी जावयाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरात घडलेल्या या घटनेमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तरुणाची मिरज मधून सुटका केली आहे. या प्रकरणी तिघा जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरे यांच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.