Vaishanvi नंतर प्रिया दीक्षित,लग्न होताच 5 महिन्यात हुंड्यासाठी छळ; दोन पानी चिट्टीत क्रूरतेचा पाढा

वैष्णवीनंतर आता उत्तर प्रदेशमधील लखनऊच्या प्रिया दीक्षितचाही हुंड्यासाठी बळी गेलाय.लग्नानंतर 5 महिन्यातच हुंड्यासाठी प्रियाचा छळ झाला आणि सरकारी नोकरी लागूनही प्रियाने मृत्युला कवटाळलंय. प्रियाने लिहिलेल्या दोन पानी चिठ्ठीत क्रौर्याची परिसीमा समोर आली. 10 डिसेंबर 2024 मध्ये प्रियाचा विवाह लखनऊचा शिक्षक शुभम टंडनशी झाला. काही दिवसातच प्रियाचा हुंड्यासाठी छळ झाला. पती, सासू, सासरे, नणंदांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. प्रियाला सरकारी नोकरी लागली होती आणि 10 जूनला तिला हजर राहण्याची ऑर्डर होती. मात्र त्याआधीच तिनं सासरच्या आणि नवऱ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलीये..

संबंधित व्हिडीओ