अहिल्यानगरमध्ये राम नवमीनिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय.या शोभायात्रांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची मागणी वाढली.अहिल्यानगरच्या कल्याण रोडवरील शिल्पकार विकास कांबळे यांनी एक अनोखी मूर्ती साकारली.औरंगजेबाच्या डोक्यावर पाय दिलेली छ.. संभाजी महाराजांची ही मूर्ती आकर्षणाचा विषय ठरली.ही 14 फुटांची मूर्ती असून ती बनवण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागला.