Ahilyanagar| संगमनेर Acid हल्ल्यातील आरोपी अद्याप फरार, आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस

अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला झाला होता.या घटनेला आता 15 दिवस उलटले तरी आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध लागावा यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी आरोपीच्या रेखाचित्राची स्केच जारी केली.तर माहिती देणाऱ्यास तब्बल 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे नागरिकांनी निःसंकोचपणे पुढे येत आरोपीबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ