हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे आज जालन्यात जोरदार अवकाळी पाऊस झालाय.जालना जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटेने हजेरी लावलीय.भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ, आडगाव शिवारात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हासह मिरची कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.तर अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.गरसुळी, पळशी आणि तत्तापूर शिवारात गहू, ज्वारीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.तर अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत.अचानक आलेल्या या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.