भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसची तोडफोड झाल्याची घटना घडली.माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या ऑफिसच्या 10 ते 12 जणांच्या टोळक्याने तोडफोड केली.तलवारी घेऊन अज्ञात हल्लेखोरांनी ही तोडफोड केली.अंबरनाथच्या बी केबीन रोडवर महाडिक यांचं कार्यालय असून रात्री पावणे अकराला हा प्रकार घडलाय.सर्व हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधले होते.10 ते 12 हल्लेखोरांचा धुडगूस सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.