अशोक खरातला भक्त आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्महाउसवर घेऊन जाण्यासाठी इच्छुक असत. अशा आउट 'डोअर व्हिजिट'साठी खरात तब्बल पाच लाखांपर्यंत रक्कम आकारत असल्याची चर्चा आहे. अमावास्या व पौर्णिमेस खरातला नेण्यासाठी पहाटेपासून महागड्या कारची लांब रांग लागत असे. मात्र, जो जास्त दाम देईल त्याच्याचकडे तो जात असे. एसआयटीनेदेखील तपासात हा खुलासा केला आहे. पहाटेपासून भाविक खरातच्या घरी यायचे असंही कळतंय.