होर्मूझच्या लढाईत सहभागी न झाल्याने ट्रम्प हे फ्रान्स आणि इंग्लंडवर संतप्त झालेत. आपल्या संतापाला वाट करून देत त्यांनी 'स्वतःसाठी लढायला शिका', असा सल्ला दोन्ही देशांच्या प्रमुखांना दिलाय. 'आमच्याकडून तेल खरेदी करा, आमच्याकडे भरपूर आहे', अन्यथा होर्मूझमध्ये जा आणि लढा' अशा शब्दांत ट्रम्प यांनी त्यांना सुनावलंय.इराण युद्धात फ्रान्सची अजिबात मदत झाली नाही, असं सांगतानाच फ्रान्सची ही भूमिका अमेरिका कधीच विसरणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय.