Pune | माऊलींच्या पालखीचा मुक्काम हलणार? 13 एप्रिलला होणार मुक्कामाचा अंतिम निर्णय | NDTV मराठी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै रोजी होणार आहे. मात्र, यंदा पुण्यातील मुक्कामाच्या जागेवरून नवा वाद निर्माण झालाय. यावर अंतिम निर्णय येत्या १३ एप्रिल रोजी घेतला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माऊलींची पालखी पुण्यातील भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्कामी असते. मात्र, वाढती गर्दी आणि मंदिरातील अपुरी जागा यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पर्यायी जागेचा शोध घेण्यास सुरुवात झालीय, यावरून वारकरी संप्रदायात मतभेद पाहायला मिळत आहेत. आळंदी देवस्थानने या वादावर पडदा टाकण्यासाठी १३ एप्रिल रोजी विशेष बैठक बोलावली

संबंधित व्हिडीओ