छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निसर्गाचा कहर पुन्हा पाहायला मिळाला आहे. जिल्ह्याच्या विविध भागात होत असलेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी बाजरीचे उभे पीक अक्षरशः मातीमोल केले आहे. बाजरीचे पीक पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त झालंय.. त्यामुळे बाजरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.. याच विदारक परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी.