अवकाळी पावसाचा Beed ला तडाखा; काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक जमीनदोस्त, नुकसानीचा घेतलेला आढावा

बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर अक्षरशः पाणी फेरलं आहे.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, गहू, हरभरा आणि उन्हाळी बाजरीची उभी पिके आडवी झाली आहेत.शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर मेहनतीची माती झाली आहे.आहेर धानोरा गावात तर उन्हाळी बाजरीचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी...

संबंधित व्हिडीओ