अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली परिसरात फुलबागांना मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे फुलांच्या बागा जमीनदोस्त झाल्यात. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर फुलांना मोठी मागणी असतानाच झालेल्या या नुकसानीमुळे फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत आढावा घेत फुल उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.