MNS Morcha Banner| हिंदीच्या मुद्द्यावरून मुंबईत बॅनरबाजी, मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो | NDTV

हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे.आता या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसे कडून ठिकठिकाणी अनेक बॅनर लावण्यात आले आहेत. यापैकीच एक महत्त्वाचा बॅनर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोर लावण्यात आला आहे. या बॅनर वर सत्तेत असलेल्या अजित पवारांचा फोटो असून इयत्ता पाचवी पर्यंत मुलांनी केवळ मातृभाषेत शिकावं इतर कोणत्याही भाषेत शिकू नये. कोणत्याही भाषेला विरोध नाही मात्र लहान वयात तीन भाषा विद्यार्थ्यांवर लागू नये. अजित पवार अशा स्वरूपाचा मजकूर देखील दिला आहे आणि याच बॅनर च्या बाजूला राज ठाकरे यांचा फोटो देखील आहे त्यामुळे हा बॅनर चांगला चर्चेत आल्याचा पाहिला मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ