पुण्याच्या रांजणगावमधील गावठाणची जमीन हडपल्याच्या प्रकरणावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय.रांजणगावच्या माजी सरपंच स्वाती पाचुंदकर यांनी गावठाणची जमीन हडपली असून त्या या प्रकरणात दोषी आहेत.असं असूनही पाचुंदकर रांजणगांव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदावर आहेत.यामुळे आता गावकऱ्यांना देवस्थान ट्रस्टच्या जमिनीच्या सुरक्षेची चिंता वाटतेय.दरम्यान अधिवेशन काळात या प्रकरणावर लक्ष घालणार असं बावनकुळेंनी म्हटलंय.