Baramati Rain| निरा कालवा फुटून अनेक भागात पाणी, बचाव पथकाकडून 8 नागरिकांची सुखरूप सुटका |NDTV मराठी

बारामतीच्या काटेवाडीत निरा कालवा फुटून अनेक भागात पाणी साचलंय.ज्या भागात पाणी साचलं त्या भागात सध्या बचावकार्य सुरूच आहे. बारामतीत अतिवृष्टी होत असून त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होतेय.त्यामुळे यु्द्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आलंय.काटेवाडी परिसरात ७ आणि बारामती शहरातील १ असे एकूण ८ नागरिकांची बचाव पथकाने सुखरूप सुटका केली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित झालेल्या काटेवाडी या गावातीलनारोळी, कोरोळी येथील काही कुटुंबांचं सुखरूप स्थलांतर करण्यात आलं.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदीपात्र, कॅनॉल परिसरात जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्यात.

संबंधित व्हिडीओ