रशिया युक्रेन युद्धात गेल्या तीन दिवसांपासून हल्ले अधिक तीव्र करण्यात आले. रशियाने रविवारी युक्रेन वर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर चांगलेच संतापले त्यांनी पुतीन यांना ठार वेडही म्हटलं तर दुसरीकडे जर्मनी सह इतर काही नाटो सदस्यांनी युक्रेन वरील शस्त्रांसंदर्भात कोणतेही निर्बंध असणार नाहीत असं स्पष्ट केलंय.