बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात १०० हून अधिक जणांना पैशांचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा गंभीर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मसणजोगी समाजाचे नेते बालाजी शेनोरे यांनी केला आहे. ठाकरे गट आणि हिंदू जागरण मंच आक्रमक झाले असून, चौकशीनंतर आरोपींना सोडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.