बीड जिल्हा दुष्काळाच्या झळांनी होरपळत असताना, सावरगाव घाटच्या भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची तयारी सुरु झालीय. संत भगवान बाबांच्या जन्मभूमीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत यंदा बारावा दसरा मेळावा पार पडणार आहे. ‘आपला दसरा, आपली परंपरा’ ही या मेळाव्याची टॅगलाईन आहे. पंकजा मुंडे आज पालकमंत्री नसल्या, तरी त्या कायम बीडच्या पालकाच्या भूमिकेतून बोलतात, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त केलीय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी