Nashik| वणीतील भरधाव कार अपघाताचं CCTV फुटेज, बॅरिकेड्सला धडक देण्यापूर्वी भाविकांना उडवलं

वणी येथील भरधाव कार अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय...पोलिसांच्या बॅरिकेड्सला धडक देण्यापूर्वी याच भरधाव कारने दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना धडक दिल्याचं या सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय...भाविकांना धडक दिल्यानंतर ही कार थेट बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या बॅरिकेड्सवर जाऊन आदळली...या भीषण अपघातात एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला असून, दोन पोलिसांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत...कारमधील चार जणांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर दोघे फरार आहेत

संबंधित व्हिडीओ