बीडच्या परळी वैद्यनाथ मंदिरात मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार समोर आलाय.सध्या मंदिराचं बांधकाम सुरू असून याठिकाणी अनेक कर्मचारी काम करत आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांनी मंदिराच्या नियोजित दर्शन मंडपातच चूल मांडली. आणि याच चुलीवर आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार घडलाय. हा प्रकार शिंदे गटाच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केलाय. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.