Beed| अवकाळी पावसामुळे आष्टीच्या टोमॅटोचा लाल चिखल, लालाबाई धोंडेंना अश्रू अनावर | NDTV मराठी

बीडच्या आष्टी शहरात मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालंय.टोमॅटोचं पीक पावसामुळे जमीनदोस्त झालंय.लालाबाई धोंडे या शेतकरी महिलेने 1 एकर शेतात टोमॅटोची लागवड केली होती. उन्हाळ्यात ठिंबकवर पाणी देऊन त्यांनी बाग फुलवली होती.मात्र मुसळधार पावसामुळे आता या बागेत चिखल झालाय. लाल टोमॅटोचा अक्षरशः चिखल पहायला मिळत आहे.त्यामुळे लालाबाई धोंडे यांना अश्रू अनावर झालेत.

संबंधित व्हिडीओ