BJP कार्यकर्त्यांना राष्ट्रीय नेत्यांचा विसर, भाजप पक्ष कार्यालयाच्या फलकावर फक्त फडणवीसच |NDTV

देवाभाऊंसमोर भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रीय नेत्यांचा विसर पडल्याचं समोर आलंय.अहिल्यानगरच्या भाजप कार्यालयात लावलेल्या फलकावर फक्त फडणवीसांनाच स्थान देण्यात आलंय.अमित शाह, जे.पी.नड्डा, बावनकुळेंचा फोटो फलकावरून गायब असल्याचं पहायला मिळतंय. 6 एप्रिल म्हणजे आज भाजपाचा स्थापना दिवस असून त्यानिमित्त अहिल्यानगर महानगर कार्यालयाच्या दर्शनी भागात नवा फलक लावण्यात आला आहे.नव्या फलकावर "भारतीय जनता पार्टी, अहिल्यानगर महानगर" असे नाव आहे.एका बाजूला भाजपाचे कमळ चिन्ह तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आलाय.परंतु फलकावर कुठेच मोठ्या नेत्यांना स्थान दिलेलं नाही.

संबंधित व्हिडीओ