बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळतीच्या घटनेमुळे चिंता वाढली होती. या केस गळतीच कारण आता समोर आलंय. बुलढाण्यामध्ये ज्या गावांमध्ये केस गळती सुरू आहे त्या भागात सेलेनियम धातूच प्रमाण हे आश्चर्यकारकरित्या वाढल्याचा दावा केला जातोय. सेलेनियम धातूच प्रमाण वाढल्यानं बाधितांच्या शरीरामध्ये झिंक च प्रमाण हे कमी झालंय आणि त्यामुळेच केस गळती होत असल्याचा निष्कर्ष ज्येष्ठ संशोधकांनी काढला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित संशोधक डॉक्टर हिंमंतराव बावस्कर यांनी संशोधनाअंती हा निष्कर्ष समोर आणलेला आहे. डॉक्टर हिंमंतराव बावस्कर हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातले आहेत आणि ते महाड किंवा मुंबई इथे असतात. विन्सुदंशावरती त्यांनी लसीचा शोध लावलेला होता.