भाजप नेते पियुष गोयल यांच्यावर मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.पियुष गोयल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नसून भाजपचे नेते आहेत.दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसल्याने त्यांचे नाक जळाले असल्याचं मिटकरी म्हणाले... .राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण हे पियुष गोयल सांगणार का ? असा सवाल उपस्थित करत, ठरवणारे ते कोण आहेत? असा संतप्त प्रश्नही त्यांनी केला. भविष्यात आपले ओठ जळणार नाहीत याची काळजी मोठ्या नेत्यांनी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.