राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. मात्र यावरुन आता रोहित पवारच मोठा खुलासा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. रोहित पवार लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते विलिनीकरणासंदर्भात झालेल्या बैठकांच्या व्हिडिओसह सर्व खुलासे करणार आहेत. पत्रकार परिषदेत रोहित पवार विलिनीकरणासंदर्भातल्या सर्वच गोष्टी समोर आणणार आहेत. विलिनीकरणावरुन पक्ष आणि पवार कुटुंबात काय ठरलं याचाही ते खुलासा करतील..