विरोधकांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमधली महिला ब्रिगेड समोर आली. रुपाली चाकणकर यांनी आरोपांबाबत सखोल चौकशी होईल अशी माहिती दिलीय.. तर कागद आहेत म्हणता? मग न्यायालयात जा, सिद्ध करा. नाहीतर बेताल वक्तव्यांनी मरणाचा बाजार मांडू नका… असं उत्तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिलंय.