चंद्रपूर शहरात दिवाळी गिफ्ट न दिल्याच्या वादातून एका कामगाराची सहा आरोपींनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पान टपरीचा मालक सुजित गणवीर याने दिवाळीचे गिफ्ट न दिल्याने कामगार नितेश ठाकरे संतापला होता. नितेशच्या शिवीगाळामुळे संतापलेल्या मालकाने मित्रांच्या मदतीने लॉ कॉलेज परिसरात त्याची हत्या केली. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तासाभरात सहाही आरोपींना अटक करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.