हिंगोली जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी 'स्वबळ' आजमावण्याचा नारा दिला आहे, तर भाजपनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे.