Chh. Sambhajinagar| मुलीचे कपडे काढले, सिगारेटचे चटके, केस कापले; क्रूर बापाविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरच्या मिसारवाडी परिसरातील एका कॉलनीत मुलीचा छळ केल्याप्रकरणी तिच्या वडिलांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. २५ ऑक्टोबर रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलाय.. आरोपीने त्याच्या मुलीचे कपडे जबरदस्तीने काढून तिच्या अंगावर थंड पाणी टाकले. तसेच तिच्या हातापायांना सिगारेटचे चटके देऊन डोक्याच्या मागील बाजूचे केस कापल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून वडीलविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ