छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ५ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर तिच्याच सासरच्या मंडळींनी अमानुष अत्याचार केले. केवळ 'मुलगी' होणार आहे म्हणून गोळ्या देऊन आणि चक्क पोट दाबून तिचा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या गुन्ह्याचा कट इतका भयानक होता की, जालन्याहून चक्क 'तोट्या' डॉक्टरांची टोळी बोलावण्यात आली होती. २७ फेब्रुवारी रोजी आरोपी पती अरबाज सय्यद याने दोन अनोळखी पुरुष आणि एका महिलेला पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह घरात आणले. 'मुलगा आहे की मुलगी हे डॉक्टर सांगतील' असं म्हणत बळजबरीने लिंगनिदान चाचणी करण्यात आली. जेव्हा स्पष्ट झालं की गर्भात मुलगी आहे, तेव्हापासून या महिलेचा नरकयातनांचा प्रवास सुरू झाला.