आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता ताडोबासारख्या जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पावरही दिसून येत आहे. ताडोबाचा हंगाम आता जोरात सुरू झाला असून पर्यटकांचा मोठी आवक इथे आहे. पुढील महिनाभराचे बुकिंग फूल आहे. एकीकडे पर्यटकांची गर्दी आहे, तर दुसरीकडे या पर्यटकांच्या भोजन व्यवस्थेची चिंता हॉटेल व्यावसायिकांना भेडसावत आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने स्वयंपाकघरात शुकशुकाट दिसून येत आहे.