रत्नागिरीत गॅस एजन्सीबाहेर रांगा, गॅस मिळण्याची मर्यादा 45 दिवसांवर;ग्राहकांशी बातचीत

रत्नागिरीत गॅस मिळण्याची मर्यादा आता 45 दिवस केली गेलीय. त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये नाराजी दिसून येते. रत्नागिरी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एचपीच्या गॅस एजन्सी बाहेर लागलेल्या रांगा काही थांबत नाहीयेत. गॅस मिळत नसल्यामुळे लांबून लांबून नागरिकांनी सकाळी लवकरच गॅस एजन्सीबाहेर नंबर लावले आहेत. रांगेत थांबून सिलेंडर घेण्याची वेळ आल्यानंतर काहींना नियमांमुळे सिलेडर मिळत नसल्याची माहिती मिळत आहे. परिणामी नागरिकांमध्ये संताप दिसून येतोय. प्रशासन आणि सरकारने योग्य माहिती द्यावी अशी प्रतिक्रिया आणि मागणी सध्या नागरिक करत आहेत. याचाच आढावा घेत ग्राहकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

संबंधित व्हिडीओ